कोयना भरले : पाण्याची चिंता मिटली

Koyna dam

सातारा : कोयना धरणात (Koyna Dam) 110 टीएमसी पाण्याची आवक झाली असून वीज निर्मिती, सिंचनाचे पाणी यांची चिंता मिटली आहे. एक जूनपासून सुरू होणाऱ्या या तांत्रिक वर्षातील पावसाळ्यातील तीन महिने संपले आहेत. जूनच्या प्रारंभी धरणात 34.37 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतरही मागील तीन महिन्यात नदीकाठच्या गावांचे, शेतीचे नुकसान न होता धरणात 110 टीएमसी पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. वीज निर्मितीसाठी धरणातील 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. त्यापैकी या तीन महिन्यांत वीज निर्मितीसाठी 12.47 टीएमसीचा वापर झाला असून त्यातून 582.855 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली.

आता नऊ महिन्यांसाठी या आरक्षित पाण्यापैकी 55.03 टीएमसी पाणी वापरता येणार आहे. तर मागील काही वर्षातील अनुभव पाहता सिंचनासाठी 36 टीएमसी पाण्याची गरज असते. त्यापैकी आत्तापर्यंत 7.48 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणूनच सिचंनासाठी यापुढे 28.52 टीएमसी पाणी वापरता येणार आहे. त्यामुळेच यावर्षीप्रमाणे पुढील वर्षी जून महिन्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER