कोविड योद्धा गेला! उपराष्ट्रपतींनी अर्पण केली श्रद्धांजली

Arf khan

दिल्ली : कोरोना (Corona) रुग्णांची सेवा करणारे रुग्णवाहिका चालक आरिफ खान (४८) कोरोनाला बळी पडले. शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते. आरिफ खान मार्चपासून कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्याचे व मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विट करून खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आरिफ खान मागील सहा महिन्यांपासून कुटुंबापासून (पत्नी व चार मुले ) दूर राहात होते. २४ तास काम करत होते. कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी ते रुग्णवाहिकेतच झोपायचे. फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात राहायचे. खान यांनी मार्चपासून कोरोनाच्या २०० रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते.

आरिफ खान २५ वर्षांपासून ‘शहीद भगत सिंग सेवा दला’सोबत काम करत होते. निःशुल्क रुग्णवाहिका पुरवायचे. २१ मार्चपासून त्यांचे हे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER