कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुक ; राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचे आव्हान

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीची निवडणूक (gram-panchayat-election) रंगतदार होणार आहे . निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काकडी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे 11 अर्ज आहेत, तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचेही प्रत्येकी 11 अर्ज दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त काही अपक्ष तर काही डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. काकडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून काळे गटाची‌ सत्ता आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कोल्हे गट‌ कसोशीने प्रयत्न करत आहे.

निवडणुकीच्या‌ तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली. त्यामुळे काळेंनी उंच उडी घेतल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER