कोकणी माणूस आणि गणराया

गणेशचतुर्थी म्हटलं की ज्यांच्या चेहऱ्यावर आभाळभर हसू दिसतं तो ‘कोकणी माणूस’ ! (Konkani Manus ) कोकणी माणूस आणि गणेशोत्सव (Ganeshostav) हे नातं काही औरच आहे. कोकणातल्या गणेशोत्सवाची शान ही वेगळीच असते. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत हा प्रवास एक अद्भुत सोहळा असतो. कोकणात ही मज्जा आणि हा उत्साह अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. गणपतीसाठी दरवर्षी कोकणी माणूस न चुकता बाप्पाच्या या सणाला कोकणात जातो. मनोभावे पूजा आणि भजनाच्या लयीत मंत्रमुग्ध झालेला कोकणी माणूस.  अश्याच एका खास कोकणी माणसाने मराठी इंडस्ट्रीत यंदा बाप्पासाठी काहीतरी खास केलयं. कोण आहे हा खास व्यक्ती आणि काय केलंय याने नक्की खास हे बघूया.

खास कोकणी माणसाने मराठी इंडस्ट्रीत यंदा बाप्पासाठी काहीतरी खास केलंय. कोण आहे हा खास व्यक्ती आणि काय केलंय याने नक्की खास हे बघूया.कला दिग्दर्शक डॉ.सुमित पाटील (Sumit Patil) याने कोकणातल्या कुडाळ येथील माणगावला यंदा बाप्पाचे काही खास व्हिडीओ तयार केले आहेत. या व्हिडीओनं सगळ्यांची मनं  जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओमध्ये कोकणातल्या खास पारंपरिक गणेशोत्सवाची ओळख संपूर्ण जगाला करून देण्यासाठी सुमितने हे व्हिडीओ तयार केले आहेत. बाप्पाची विविध रूपं  तो आपल्यासमोर घेऊन आला आहे. गणपतीला बुद्धीची देवता मानतो हेच बाप्पाचं मनमोहक रूप किती छोट्या  छोट्या गोष्टीत दडलंय हे त्यांच्या व्हिडीओमधून अनुभवयाला मिळतंय. बाप्पाची ही अनोखं रूप दाखवताना बाप्पाचं निसर्गाशी असलेलं अतूट नातंदेखील नकळत समोर आलं आहे. बाप्पाच्या विविधरूपी कला आपल्याला खूप आवडून जातात. चला तर बघू या नेमका बाप्पा कुठे कुठे दडलेला आहे आणि बाप्पाची ही  अनोखी रूपं  सांगतोय कला दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील…

”   होय देव दगडात सुद्धा आहे… “

आज व्यक्त होण्याचं कारण म्हणजे आपला गणपती उत्सव- जो आम्ही कोकणात निसर्गासोबत सेलिब्रेट करतो. खरं तर कोकणातील जुने लोक पावसात वाहून आलेली जवळच्या नदीतील माती घेऊनच गणपती बनवून पुन्हा नदीला तिची माती परत करायचे.  आम्हीही नदीतले दगड-गोटे घेऊन गणपती तयार केले.  नैसर्गिक रंगात रंगवले.  ही नदी उगम पावते शिरशिंगे खोऱ्यात आणि समुद्राला मिळते पेडणे तालुक्यातल्या केरी गावात. पश्चिम घाट ते समुद्र असा प्रवास करताना वाटेत येणाऱ्या कोकणातील प्रत्येक गावात एक वेगळे रूप वेगळे रंग घेऊन वाहते, गावातल्या संस्कृतीत मिसळते. त्याचबरोबर कोकणी रानमाणूस ह्यांच्याबरोबर केलेला हा उपक्रम मनाला समाधान देणारा होता आणि कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे ह्यांच्या कामाला माझा सलाम !

” पर्यावरण पूरक बाप्पा “

गणेशोत्सवाची परंपरा कोकणात वर्षानुवर्षे मोठ्या भक्तिभावानं आणि आपुलकीनं जपली जातेय. काळानुरूप होणाऱ्या  बदलामुळे पर्यावरणाची हानी लक्षात घेता मी  आणि श्रीरंग संस्थेच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील माणगावच्या गावकऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा शुभारंभ केलाय. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाला साद देत गावकऱ्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. एक वाडी पर्यावरणपूरक होत असेल तर गावही होईल. गावांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रासह देशभरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल.

” आजीच्या गोधडीत  लपलेला बाप्पा “

गोधडीला आजीच्या प्रेमळ मायेची ऊब असते. जुन्या कापडांना वाया जाऊ न देता बनलेली ही गोधडी म्हणजे रिसायकलचं वर्षानुवर्ष चालत आलेलं प्रत्येक घरातलं उदाहरण आहे. मी आणि माझ्या टीम सोबत  श्रीरंग संस्थेच्या पुढाकाराने या मायेच्या गोधडीतून मंगलमुर्ती बाप्पाचं रूप साकारलंय.

” बाबूंतून साकारला बाप्पा “

कितीही उंच वाढला तरी जमिनीला नतमस्तक होता आलं पाहिजे. असं जीवनातलं खूप कडू सत्य शिकवणारा बांबू हा बहुवर्षीय वनस्पती असून आयुर्वेदातही त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितलयेत. कोकणातील अनेक घरांच्या परसात बाबुंची अनेक झाड दिसतात. भारतात अनेक ठिकाणी या बांबुंची शेतीदेखील होते. बांबुंचा वापर करत पर्यावरणपुरक बाप्पा साकारण्यात आलाय.

चला, यंदापासून संकल्प करूया पर्यावरण रक्षणाचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER