निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी केंद्राची ४०० कोटींची उपाययोजना

Nisarga Cyclone

मुंबई :  जवळपास तीन महिन्यांपूर्वी कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आता केंद्र सरकारने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह 700 कि.मी. किनारपट्टीसाठी 460 कोटी रुपयांचा (Rs 460 Cr) राष्ट्रीय चक्रीवादळ आपदा प्रकल्प (एनसीआरएमपी) तयार केला आहे.

केंद्राचा 367.8 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे, तर राज्याचा हिस्सा 91.72 कोटी असेल. 11 बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थान, 471 किमी भूमिगत केबलिंग आणि 26.26 कि.मी. बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणात धडक दिली तेव्हा ७१ लोक मृत्युमुखी पडले होते. २,३९१ घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली. एकूण नुकसानीचे अंदाज हजार कोटी रुपये होते. एनडीआरएफने(NDRF) १७ पथक तैनात केले आणि १,२२१ लोकांना बाहेर काढत १,४९० जणांची सुटका केली.

हा मुद्दा लोकसभेत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला. केंद्राने अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी कायम यंत्रणा तयार केली आहे की नाही याची माहिती त्यांनी मागितली. त्यांना माहिती देण्यात आली की आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्यावर अवलंबून आहे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद फंड व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून विहित नियमांनुसार प्रभावित राज्यांना आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील माहिती गृह मंत्रालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी पूरग्रस्त राज्यांसाठी स्वतंत्र आंतर-मंत्रालयीन संघांची स्थापना केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER