कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिले, मात्र देण्यासाठी आखडता हात; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग : तौक्ते वादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर होते. या दोन दिवसांत फडणवीसांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानग्रस्त भागातील जनतेच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. राजकारणासाठी कोकणाने शिवसेनेला (Shiv Sena) नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. पण आता देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात असल्याची टीका फडणवीसांनी केली.

फडणवीस म्हणाले, राजकारणासाठी कोकणाने शिवसेनेला खूप काही दिले आहे. पण आता निसर्ग चक्रीवादळ असो की तौत्के असो, जेव्हा मदत करण्याची पाळी आली आहे तेव्हा हात आखडता घेतला जातो. कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, कधी अजून तिसरीकडे बोट दाखवायचं. हा महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) एककलमी कार्यक्रम दिसतो. मला असं वाटतं की एकीकडे ५०० ते ६०० कोटी रुपये एकएका मतदारसंघात घेऊन चालले आहेत. मात्र, चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जिल्ह्यांना १५० ते २०० कोटी रुपये देण्यासाठीही कारण पुढे केले जातात, हे बरोबर योग्य नाही. आमची अपेक्षा आहे की सरकारने योग्यप्रकारे मदत केली पाहिजे.

तौत्के चक्रीवादळामुळे आंबा उत्पादकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक झाड उन्मळून पडल्यानं भविष्यासाठीही हे मोठं नुकसान आहे. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्यांच्या जुन्या बोटींचे परवाना नुतनीकरण, डिझेल परतावा अशा अनेक मागण्या पुढे आल्या आहे. त्या सर्व शासनदरबारी मांडण्यात येईल, असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button