संगमेश्वर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. कोमल रहाटे यांची नियुक्ती

Komal Rahate

रत्नागिरी/प्रतिनिधी: संगमेश्वर तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. कोमल रहाटे यांची नियुक्ती करण्यात आली. सौ. कोमल रहाटे यांची नियुक्ती भाजपा संगमेश्वर तालुका कार्यालयात भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

यावेळी भाजपा संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री.प्रमोद अधटराव, रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष रश्मीताई कदम, देवरुख नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष श्री.सुशांत मुळ्ये, संगमेश्वर भाजपायुमो अध्यक्ष रुपेश कदम, देवरुख शहर अध्यक्ष सुधीर यशवंतराव, देवरुख नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, नगरसेवक तथा बांधकाम सभापती श्री.राजेंद्र गवंडी, नगरसेवक कुंदन कुलकर्णी, नगरसेवक सौ. निधी आंबेकर, भाजपा जेष्ठ नेते बबन किर्वे, भाजपा जेष्ठ नेते श्री. मुकुंद जोशी, भाजपा युवा नेते भगवत सिंह चुंडावत, पांड्या आंबेकर, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.