IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा १२ वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात दुबईमध्ये खेळला गेला. हा सामना कोलकाताने जिंकला. केकेआरने राजस्थानला ३७ धावांनी पराभूत केले. आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव आहे, तर कोलकाता संघाचा सलग दुसरा विजय.

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १३७ धावा करू शकला. यासह कोलकाताने हा सामना ३७ धावांनी जिंकला.

कोलकाताकडून शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीने शानदार गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यापूर्वी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित षटकांत सहा गडी गमावून १७४ धावा केल्या. केकेआरकडून शुभमन गिलने ४७, इयन मॉर्गनने (३४ *) आंद्रे रसेलने (२४) आणि नितीश राणाने २२ धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER