दादोजी कोंडदेव क्रिडागृहात पुन्हा रंगणार कोलकत्ता नाईट्स राईडर्सचा सराव

Kolkata Knight Riders - IPL

ठाणे : मागील वर्षी प्रमाणो यंदाही ठाणो पालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडागृहामध्ये सराव करण्याची परवानगी आयपीएल मधील कोलकत्ता नाईट रायडर संघाने मागितली आहे. त्यानुसार यंदा पुन्हा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज दादोजी कोंडदेव क्रिडागृहात सरासाठी दाखल होणार आहे. या क्रिडागृहासाठी 3.25 कोटी रु पये खर्च करुन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. मागील वर्षी देखील या नव्या खेळपट्टीवर खेळपट्टीवर कोलकत्ता नाईट रायडर्स या संघातील खेळाडूंनी नेट मध्ये सराव केला होता.

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रिडागृहावर 1982-83 ते 1995-96 या कालावधीत केवळ सहा सामने झाले होते. मुंबई संघाच्या बडोदा, गुजरात, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघाबरोबर लढती झाल्या होत्या. मात्र सध्या शालेय किंवा इतर स्तरावरील सामने भरवले जातात. इतके मोठे स्टेडीअम असूनही रणजी सामने होत नसल्याने क्रि केटपटूंमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु ठाणो पालिका प्रशासनाने स्टेडीअमवर विकेट आणि आऊटफिल्ड बनवण्याचे काम हाती घेतले आणि त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीचा शुभारंभ ठाणो जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी करण्यात आला होता.

त्यानिमित्ताने मराठी चित्रपट सुष्टीतील कलाकारांची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर या खेळपट्टीवर कोलकत्ता नाईट राईडरच्या खेळाडूंनी सराव केला होता. दरम्यान यंदाच्या वर्षी सुरवातीला तब्बल पंचवीस वर्षांनी या खेळपट्टीवर सी. के नायडू स्पर्धेतील प्रथम श्रेणीचा मुंबई विरु ध्द बंगाल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या स्टेडियमच्या व्यवस्थापनाकडे कोलकत्ता नाईट रायडरच्या संघा कडून येथील खेळपट्टीवर सराव करण्याची परवानगी मागण्यात आली. याबाबतची परवानगी मिळाल्यानंतर या संघातील खेळाडू येथे सराव सुरु करणार आहेत. या निमित्ताने पुन्हा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सराव पाहण्याची संधी ठाणोकर क्रिकेट रसिकांना उपलब्ध होणार आहे.