कोलकाता नाईट रायडर्सच्या “या” फलंदाजाचा दावा – सीएसकेच्या फलंदाजांना आणतील अडचणीत

CSK - KKR Rahul Tripathi

इंडियन प्रीमियर (IPL 2020) लीगच्या १३ व्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत होणार आहे. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आधीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून विजय मिळवत महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील सीएसकेची टीम स्पर्धेत परतली, तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात केकेआरची टीम मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाली. सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी केकेआरचा फलंदाज राहुल त्रिपाठीने काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.

केकेआरने चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत व दोन पराभूत झाले आहेत, तर सीएसकेने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले आहेत, दोन जिंकले आहेत आणि तीन सामने गमावले आहेत. त्रिपाठीला असे वाटते की त्यांचे गोलंदाज येथे खेळपट्टीची अपेक्षा करतात आणि ते सीएसके फलंदाजांसाठी समस्या निर्माण करू शकतात. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील केकेआरचे आक्रमण ३ ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांसमोर काहीच चालले नाही आणि त्यांचा संघ १८ धावांनी पराभूत झाला. परंतु त्यांच्या संघाला येथील मैदानाविषयी चांगले माहिती आहे आणि त्यामुळे संघाकडून सीएसकेविरुद्धच्या सामन्यात चांगल्या निकालाची अपेक्षा आहे.

त्रिपाठी म्हणाला, ‘आम्ही बर्‍याच दिवसांपासून येथे सराव करीत आहोत. आमच्यासाठी ते होमग्राउंडसारखे आहे. आम्हाला या मैदानावर खेळण्याचा काही अनुभव आहे. आमच्या गोलंदाजांना माहित आहे की येथे कशी गोलंदाजी करायची. तो म्हणाला, ‘आमच्या शेवटच्या सामन्यात (राजस्थान रॉयल्सविरुद्ध) आमच्या सर्व गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. इथली मैदाने शारजाहपेक्षा मोठी आणि पूर्णपणे वेगळी आहेत. आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील आणि सीएसकेच्या फलंदाजांसाठी समस्या निर्माण करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER