तब्बल 32 सामन्यानंतर कोलकाताने निवडली होती प्रथम फलंदाजी

KKR Batting.jpg

आयपीएलमध्ये (IPL) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) प्रथम फलंदाजी करत 167 धावा केल्या आणि चेन्नई नाईट रायडर्सवर (CSK) 10 धावांनी विजय मिळवला. यात वैशिष्ट्याचा भाग हा की, तब्बल 32 सामन्यांनंतर आणि पाच वर्षात प्रथमच केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी मे 2015 मध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुध्द त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. तेंव्हा गौतम गंभीर त्यांचा कर्णधार होता.

यंदाच्या मोसमात याआधी त्यांनी दोन वेळा नाणेफेक जिंकली आणि दोन्हीवेळा त्यांनी पहिले क्षेत्ररक्षणच घेतले होते. आंद्रे रसेल, इयान माॕर्गन व दिनेश कार्तिकसारखे तडाखेबंद फलंदाज असल्यावर हा निर्णय स्वाभाविकही आहे. पण तरीही मनोजोगी त्यांची कामगिरी झालीच नाही. आघाडी फळी अपयशी ठरत गेली. शारजात पाठलाग करताना ते हरले कदाचित त्यामुळे त्यांनी प्रथम फलंदाजीचा पर्याय निवडला असावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER