IPL 2020: वरुणची घातक गोलंदाजी, कोलकाताने दिल्लीला ५९ धावांनी पराभूत केले

Kolkata beat Delhi by 59 runs

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ४२ व्या सामन्यात शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) ५९ धावांनी पराभूत केले. विजयासाठी १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १३५ धावा करू शकला.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या निमंत्रणानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १९४ धावा फटकावल्या आणि सुरुवातीच्या धक्क्यातून सावरला. कोलकाताकडून सलामीवीर नितीश राणाने सर्वाधिक ५३ चेंडूंत ८१ धावांचे योगदान दिले. याशिवाय सुनील नारायणनेही ३२ चेंडूत ६४ धावांची त्वरित खेळी खेळली. दिल्लीकडून एनरिच नोर्जेने ४ षटकांत २७ धावा देत २ गडी बाद केले, कॅगिसो रबाडाने ४ षटकांत ३३ धावा देऊन २ बळी घेतले आणि मार्कस स्टोनिसने ४ षटकांत ४१ धावा देऊन दोन बळी घेतले.

आता दिल्लीचा संघ ११ पैकी ७ सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे आणि दिल्लीला फक्त ४ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच, कोलकाताचा संघ ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि ५ मध्ये तो पराभूत झाला आहे. अशाप्रकारे, दिल्ली १४ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे तर कोलकाता १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER