कोकण भवनला गावठाण, कोळीवाडय़ातील रहिवाशांच्या क्लस्टरच्या विरोधात हरकती, सुचनांचा पाऊस

cluster-development-thane

ठाणे :- एकीकडे विधानसभा निवडणुकीत ठाण्यात क्लस्टरच्या श्रेयाचे भांडवल करुन प्रचार केला जात आहे. तर दुसरीकडे याच भागातील गावठाण, कोळीवाडे भागातील रहिवासी हे आजही या योजनेच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार कोकण भवन येथे ठाण्यातील या रहिवाशांनी असंख्य हरकती, सुचना या लेखी स्वरुपात सादर केल्या आहेत. त्यामुळेच क्लस्टरमधील अडचणीत दूर झाल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात यामध्ये आजही असंख्य अडचणीत आहेत, हेच कदाचित या रहिवाशांनी दाखवून दिले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी क्लस्टर योजनाला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र या योजनेसाठी आता शासनाकडून हरकती, सुचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकती, सुचनांचा कितपत विचार होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. असे असले तरी देखील ठाण्यातील विविध भागातील गावठाण, कोळीवाडय़ातील रहिवाशांनी कोकण भवनला जाऊन आपल्या सुचना, हरकती सादर केल्या आहेत. या रहिवाशांचा आजही या योजनेला ठाम विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावातील जेष्ठ मंडळी,माता, भगीनी आदींचा देखील यात मोठा सहभाग असल्याचे दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असतानासुध्दा आणि क्लस्टर योजना कशी चांगली आहे, हे सांगत त्याचे भांडवल करण्याचा प्रकार ठाण्याच्या निवडणुकीत दिसून येत आहे. परंतु असे असले तरी कोळीवाडा व गावठाण मधील भुमीपुत्र व रहिवाशी आज ही आपल्या मागणी वर ठाम व जागरूक असल्याचे स्पष्ट केले आहे. कारण जर आपण बेसावध असलो तर पुढील पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही याची जाणीव या मंडळींना असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळेच ठाणोकरांनी व भूमिपुत्रंनी सुध्दा क्लस्टर संबंधी हरकती सूचना नोंदवाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर गावागावात बैठका घेऊन सोशल मीडिया वर मेसेज टाकून आपले कर्तव्य बजवावे यासाठी आवाहनही केले जात आहे.

प्रत्यक्षात जन जागृतीचे हे काम महापालिकेचे आहे. परंतु महापालिका ते करताना दिसत नाही. ठाणोकरांना अंधारात ठेऊन जबरदस्तीन क्लस्टर योजना रेटण्याचा हा डाव असल्याचा आरोपही आता पुन्हा या रहिवाशांकडून करण्यात आला आत्ते. ठा.म.पा. व योजना राबविण्यासाठी पुढाकार घेणारे राजकीय नेते ठाणोकरांनी आपल्या सूचना हरकती शासन दरबारी मांडाव्या यासाठी विशेष मेहनत घेताना व जनजागृती करताना दिसत नाही. परंतु कोळीवाडा गावठाण मधील भूमिपुत्र डोळ्यात तेल घालून या सर्व घटने कडे पाहत आहे. त्यामुळे ते स्वत: व ठाणोकरांनी आपली मते निर्भिडपणो व कोणत्याही दबावात न येता व ही योजना लोकाभिमुख व्हावी व ठाणोकर जनतेच्या हरकती व सूचना शासन दरबारी जाण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहनही ठाणो शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : ठाणे जिल्ह्यात 13 दिवसात बांधले 30 वनराई बंधारे