परप्रांतीय मासेविक्रेत्यांना हटवण्यासाठी कोळी महिलांचे राज ठाकरेंना साकडे

मुंबई : डोंगरी येथील कोळी महिलांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. डोंगरी येथील मासळी बाजारात बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

भेटीची कोणतीही वेळ न घेता या महिला थेट कृष्णकुंजवर दाखल झाल्या. परंतु तरीदेखील राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजबाहेर आले. यावेळी राज यांनी कोळी महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांची मागणी ऐकूण घेतली. या कोळी भगिनींची समस्या महत्त्वाची असल्याने त्या वेळ घेऊन आल्या नसल्या तरी राज यांनी त्यांची भेट घेतली.

डोंगरी मासळी बाजाराबाहेर (मच्छीमार्केट) बेकायदा मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सतत वाढत आहे. अतिक्रमण करणारे मासेविक्रेते हे परप्रांतीय असून ते बेकायदा मासेविक्री करत आहेत. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे कोळी महिलांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे या अनधिकृत मासेविक्री करणाऱ्यांना त्या ठिकाणावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी महिलांना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER