कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी कृष्णकुंजवर, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलणार 

Raj Thackeray.jpg

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे  विविध संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी कृष्णकुंजवर भेट देत आहेत. आज  कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर दाखल झाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

नुकतंच मुंबईतील कोळी बांधवांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसमोर विविध मागण्यांचं गाऱ्हाण मांडलं. या मागण्या ऐकल्यानंतर राज ठाकरेंनी मी सरकारशी याबाबत बोलेन असे आश्वासन दिले.

आज महाराष्ट्र वारकरी संप्रदाय पायिक संघाच्या महाराजांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी वारकीय संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवनगी द्या, अशी मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शासनाकडून लादण्यात आले होते. त्यावेळी वारकरी संप्रदायाकडून सामाजिक भान राखत वारी करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक अतंर्गत कार्तिक वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली.

त्याशिवाय बँड, घोडे, रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरु करावा, या मागणीसाठी मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाकडून हा व्यवसाय सुरु करा, या मागणीसह इतरही मागणी केली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER