कोरोनामुळे यंदा कोल्हापूरचा शाही दसरा रद्द

Kolhapur Dusshera

कोल्हापूर : करवीर संस्थानच्या राजघराण्याच्या वतीने दरवर्षी विजया दशमी दिवशी होणारा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे सांगितले.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी शाही दसरा सोहळा होतो. या सोहळ्यास अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराज पालखीसह छत्रपती घराण्यातील सर्वजण शाही गणवेश परिधान करून मेबॅक या गाडीतून लवाजम्यासह चौकात येतात. तेथे हजारो कोल्हापूर उपस्थितीत राहून सोने लुटण्याचा पारंपारिक कार्यक्रम होतो. म्हैसूर आणि करवीर या दोन संस्थानच्या वतीने होणारा हा सोहळा गेले अनेक वर्षे सुरू आहे. यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक वर्षानंतर प्रथम हा सोहळा खंडित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER