गोकुळच्या निमित्ताने कोल्हापुरच्या राजकारणाला उकळी

Congress & Shivsena & NCP

कोल्हापूर : गोकुळच्या आतापर्यंतच्या निवडणुकांतील सर्वात मोठा राजकीय संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळत आहे. गोकुळच्या (Gokul) निमित्ताने होणारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena)यांच्यातील नेत्यांची विभागणी आणि सत्ताधारी संचालकांतील नाराजी असे कंगोरे आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठींबा महत्वाचा असल्याने जिल्हा बँकेचे सत्ताकारण केंद्रस्थानी ठेवूनच दोन्ही बाजूंनी जोडण्या घातल्या जात आहेत.

विरोधी आघाडीशी चर्चा, आरोप-प्रत्यारोपांची उत्तरे, नाराज घटकांशी बोलणी आदी जबादारी आ. पी. एन. पाटील यांच्याकडे आहे. तर पडद्यामागील घडामोडी आणि संचालकांत समन्वयाची जबादारी महादेवराव महाडिक यांनी घेतली आहे. जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अधिक रस आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गोकुळ आणि जिल्हा बँकेची सांगड घालण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणातील उपद्रव्य मुल्य वाढवून गोकुळची फळी मजबूत करण्यावर आ. पी. एन.पाटील यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील आणि खा. संजय मंडलिक यांचा भर आहे.

सत्ताधारी संचालकांत धूसफूस आहे. विरोधी आघाडीतही सर्व काही अलबेल नाही. शिवसेना महाआघाडीत असूनही ठराव स्वतंत्रपणे दिले आहेत. विधानसभेच्या राजकारणामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांनीही गोकुळसाठी सवतासुभा मांडला होता. आता बदलेल्या राजकीय संदर्भाने गोकुळसाठी नव्याने राजकीय पट मांडला जात आहे.

गोकुळमध्ये आ. पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांची आघाडी आहे. त्यास भाजपचा पाठींबा आहे. आ. विनय कोरे आणि महादेवराव महडिक गोकुळच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. विधानसभेचे प्रतिस्पर्धी आ. प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील गोकुळच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार का? हातकणंगलेत महाडिक विरोधात आ. राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर अशी आघाडी होईल का? राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपविरोधात असल्याने लोकसभेचे प्रतिस्पर्धी असूनही खा. धैर्यशील माने आणि शेट्टी गोकुळच्या निमित्ताने कदाचित एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER