कोल्हापूरचे अर्थकारण पूर्वपदावर

GST

कोल्हापूर : कोरोना (Corona) आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेले उद्योग व्यवसाय, बाजारपेठांसह एकूणच जिल्ह्याचे अर्थकारण पूर्वपदावर येत असल्याचे शुभसंकेत मिळत आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याचा जीएसटी (GST) महसूल वसूल 503 कोटी रुपयांवर गेला आहे. याचा अर्थ जिल्ह्याच्या अर्थकारणात गेल्या तीन महिन्यांत सुमारे 30हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांसह एकूणच अर्थकारणाला सुमारे 45 टक्के हादरा बसला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात कोल्हापुरातून 2039.15 कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला होता. यंदा यामध्ये 25 टक्के वाढ अपेक्षित होती; मात्र मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील उद्योगधंदे बंद पडले आणि जीएसटीही रोडावला. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांत जिल्ह्यातून 670 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल होता. लॉकडाऊनमुळे यंदा याच कालावधीत त्यात घट होऊन तो 375 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला होता.

मात्र, आता उद्योग-व्यवसाय आणि बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्याने गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 504 कोटी रुपयांचा जीएसटी (नोंदणी फीसह) वसूल झाला आहे. जिल्ह्यातील अर्थकारण पूर्वपदावर येत असल्याचे हे शुभसंकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER