लोकप्रतिनिधींना शुभेच्छा न देण्याचा कोल्हापूरकरांचा निर्धार : इशारा

पंचगंगा घाट संवर्धनासाठी उचलेले पाऊल

Kolhapurites decide not to wish good luck to people's representatives

कोल्हापूर : पंचगंगा कोसळलेल्या घाटाच्या (Panchganga Ghat)दुरावस्थेस लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, शासकीय अधिकारी, हेरिटेज समिती आदींचा अक्षम्य दुर्लक्षपणा जबाबदार आहे. असा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी यास जबादार असलेल्या सर्वांना यापुढे कोल्हापूरकरांनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी घाटाची पाहणी करुन १ मार्चपर्यंत दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगेचा घाट ढासळत अहोत. जबादार घटक मात्र एकमेकांवर ढकलत असल्याचा निषेध म्हणून कोसळलेल्या बुरुजापाशी कार्यकर्त्यांनी मरणासन्न अवस्थेत पडून राहून निषेधाचे बॅनर लावून आंदोलन केले. १ मार्चला फिरोझ शेख आणि राजवर्धन यादव यांनी एक दिवस गळ्यापर्यंत नदी पाण्यात उभे राहून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आर्किटेक्टस् असोसिएशनचे स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशांत हडकर यांनी स्ट्रक्चरल डिझाईन सामाजिक जबाबदारी म्हणून विनामोबदला देण्याचे जाहीर केले.

यावेळी परीखपूल समिती, शहर कृती समिती, आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स असोसिएशन, रेल्वे कमिटी सदस्य, आखरी रास्ता कृती समिती, शहरभान चळवळ आदींचे रमेश मोरे, अजित सासणे, अनिल घाटगे, किशोर घाटगे, अजय कोराणे, राज डोंगळे, चोपदार, शिवनाथ बियानी, संजय पाटील, जीवन बोडके, सुधीर हंजे, सुशिल हंजे, उमेश कुंभार, संतोष रेडेकर, सचिन पाटील, रियाझ बारगीर, संजयसिंह घाटगे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER