कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध

Hasan Mushrif-Kolhapuri Chappal-Amazon

कोल्हापूर :  देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल (kolhapuri Slippers) आता ॲमेझॉन (Amazon) या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन (Online) विक्री प्रारंभ झाला.

कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण
भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER