
कोल्हापूर :- पेट्रोल (Petrol) लवकरच शंभरी पार करेल अशी शक्यता आहे. कोल्हापुरात (Kolhapur) पेट्रोलचा दर ९६ रुपये २० पैसे झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका नावाजलेल्या पेट्रोल पंपावर लावलेला फलक चर्चेचा विषय ठरला. ‘पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पहावे… छातीत कळ आल्यास पंपमालक जबाबदार नाही.’ ग्राहकांसाठी दिलेला सूचक इशारा सध्या सोशल मीडियातून चर्चेचा विषय बनला आहे.
रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ वरील पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावरील कोरगावकर पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी हा सूचक इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियातून हे व्हायरल झाले असून, पंपमालकांनीही यास दुजोरा दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला