कोल्हापुरी गुळाचे होणार ब्रॅण्डिंग

कोल्हापुरी गुळ

कोल्हापूर : जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तयार होणाऱ्या सहा लाख क्विंटल गुळाला (Jaggery) भौगोलिक मानांकनाचा (जीआय) फायदा होणार आहे. वर्षाला अडीचशे कोटी उलाढाल असलेल्या कोल्हापुरी गुळाला (Kolhapuri Jaggery) जीआयमुळे जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होत आहेत. कोल्हापुरी गुळाचे ब्रॅण्डिंग होणार असल्याने याचा सर्वंकष लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे.

कोल्हापुरी गुळासह चप्पल, आजरा घनसाळ यासह २४ कृषी उत्पादकांना भौगोलिक मानांकन चार वर्षांपूर्वी मिळाले त्याची अंमलबजावणी आता होत आहे. कोल्हापुरातील उत्पादित ८० टक्के गूळ गुजरात आणि राजस्थानला जातो. १० हजार क्विंटल गूळ इंग्लंड, अमेरिका, आखाती देश व ऑस्ट्रेलियात निर्यात होतो. गुऱ्हाळघरांचे अर्थकारण बिघडल्याने जिल्ह्यात यापूर्वी हजारांवर असणारी गुऱ्हाळघरांची संख्या आता ४००वर आली आहे. २००१ मध्ये गुळाचे वार्षिक उत्पादन १९ लाख ८५ हजार रवे होते. २० वर्षांनंतर २१ लाख ७ हजार रव्यांचे उत्पादन होते. मागणीप्रमाणे उत्पादनात वाढ झाली नाही. जीआय मानांकनामुळे हक्काची बाजारपेठ मिळाल्याने कोल्हापुरी गुळाचा दर वाढेल. शेतकरी गूळ उत्पादनाकडे वळतील अशी आशा आहे.

जीआयमुळे कोल्हापुरी गुळाला हक्काची बाजारपेठ मिळून चढा दर मिळेल. ब्रॅण्डिंग होईल. विशिष्ट पॅकिंग आणि बारकोड पद्धतीमुळे भेसळीला चाप बसेल. दिवाळीनंतर शेतकऱ्यांचे शिबिर घेऊन जीआय प्रमाणपत्रे दिली जाणार असल्याची माहिती पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER