कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून अन्य संस्थांना औषध पुरवठा बंद : अमन मित्तल

Aman Mittal

कोल्हापूर : कोरोनाच्या (Corona) प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजनांतर्गत जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून (National Health Mission) विविध प्रकारची साधनसामग्री, साहित्य, औषधे आदी खरेदी करण्यात आली. हे साहित्य सर्व शासकिय आरोग्य संस्था, शासकिय कार्यालये, अन्य सहयोगी आरोग्य विषयक संस्था यांना पुरवण्यात येत आहे. मात्र 5 ऑक्‍टोबरनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्था व जिल्हा परिषदेकडील शासकीय यंत्रणा वगळता अन्य संस्थाना हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांनी दिली.

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साठ्याची उपलब्धता व निधी नियोजन याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्यानुसार सर्वच संस्थांना जिल्हा परिषदेकडून साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र 5 ऑक्‍टोबर पासून जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून केवळ जिल्हा परिषदेच्या संस्थांनाच कोरोनाच्या अनुषंगाने साहित्य पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात उर्वरित संस्थांनी कोरोना प्रतिबंध व उपचारासाठी आवश्‍यक साहित्य, साधनसामग्री, औषधे इ. उपलब्ध करुन घेणे, व आवश्‍यक साठा करणे याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातुनही जर कोणी नियोजन केले नसेल तर पुढील 15 दिवसात हे नियोजन करावे.

सर्वच आरोग्य यंत्रणांनी 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडे कोरोनाच्या अनुषंगाने साठा उपलब्धतेसंदर्भात आवश्‍यक कार्यवाही करावी व आपले अधिनस्त आरोग्य संस्थेत दाखल होणारे रुग्ण आपल्या अधिनस्त कर्मचारी यांना आवश्‍यक साठा उपलब्ध होईल याची दक्षता घेण्याचे आवाहनही श्री.मित्तल यांनी केले आहे. याबाबत सर्व संबधित यंत्रणा उदा. महापालिका आयुक्‍त, पोलिस अधिक्षक, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपालिका यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री.मित्तल यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER