अंबाबाईची कुंडलिनी रुपात पूजा

कोल्हापूर : आज अश्र्विन शुद्ध प्रतिपदा श्रीशके १९४२ अर्थात १७/१०/२०२० आज घटस्थापनेच्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई (Ambabai) श्री कुंडलिनी रूप पराम्बिकेच्या स्वरुपात नटली आहे. पराम्बा अर्थात वाणी शब्द याला अनाकलनीय असं भगवतीचं रूप . अशी ही जगदंबा जिने त्रिनेत्र आणि दोन हाताचं रूप धारण करून एका हातामध्ये रत्नजडित मधुपात्र आणि दुसऱ्या हातात लाल कमळ धारण करणाऱ्या या देवीचा वर्ण हा उगवत्या सूर्याचा प्रमाणे अर्थात सिंदूरी आहे. डोक्यावर माणकं जडवलेला किरीट आणि चंद्र धारण करणारी सुहास्य वदना अशी ही पराम्बिका रत्नघटावर चरण ठेवून विराजमान आहे.

ही बातमी पण वाचा:- तोफेच्या सलामीने अंबाबाई नवरात्रोत्सवास सुरुवात

या कुंडलिनी स्वरूपी देवीचे ध्यान ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे पठणापूर्वी अवश्य केले जाते. योगी जनांच्या साधनेचा आधार म्हणजे कुंडलिनी जागृती जी सुप्तावस्थेत असते त्या मुळे आपण सर्व भवबंधनात असतो पण मूलाधार चक्रात साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही पराशक्ती जागी होऊन षट्चक्रांचा भेद करत सहस्त्रार चक्रात पोहोचतो आणि उन्मनी अवस्था रूप अमृताची वृष्टी करते अशी ही कुंडलिनी भगवती आपल्यावर नवरात्र नावाच्या साधनापर्वात कृपा वृष्टी करो हीच जगदंबा चरणी प्रार्थना.

सिन्दूरारूण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलि स्फुरत्
तारा नायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहाम् |
पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं
सौम्यां रत्न घटस्थ रक्तचरणां ध्यायेत् पराम्बिकाम्
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER