कोल्हापूर एक्सपोर्ट हब बनणार : खा. संजय मंडलिक

Sanjay Mandlik

नवी दिल्ली :- जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विदेश व्यापार महानिर्देशयालयाशी सलग्न ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटीची स्थापना करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कार्यालयास दिल्या आहेत. याबाबत संसदेच्या चालू अधिवेशनात विदेश व्यापार महानिर्देशयालयाच्या अधिकाऱ्यांशी वाणिज्य मंत्रालयात चर्चा केली होती. त्यानुसार ही समिती स्थापन होत असल्याची माहिती खा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी दिली.

जिल्ह्यातील कृषी, औद्योगिक फौंड्री, डेअरी, हँडक्राफ्ट आदी वस्तुंना जगभर मागणी आहे. या समितीच्या स्थापनेमुळे जिल्हा हा एक्सपोर्ट हब होण्यास मदत होईल. उद्योगांना निर्यातीबाबत मार्गदर्शन मिळेल. निर्यात प्रक्रिया सुलभ होईल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीची स्थापना लवकरात लवकर करावी, असे जिल्हा प्रशासनास कळविले आहे. या कमिटीची बनविताना चेंबर ऑफ कॅामर्स, विविध औद्योगिक संघटना, जिल्हा उद्योग केंद्र, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्योग व कृषी प्रक्रीया इ. घटकांशी विचार विनीमय करावा अशी सुचना दिली असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER