३ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-तिरुपती रेल्वे होणार सुरू

Kolhapur - Tirupati Railway

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) – तिरुपती (Tirupati) मार्गावर बुधवारपासून रेल्वेसेवा (Railway) सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यापाठोपाठ बुधवारपासून कोल्हापूर- तिरुपती मार्गावर विशेष रेल्वे सुरू होणार आहे. त्याचे बुकिंग येत्या चार दिवसांत सुरू होईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे (Lockdown) २६ मार्चपासून सर्व रेल्वे सेवा बंद होती. टप्प्याटप्प्याने आता या सर्व गाड्या सुरू केल्या जात आहेत. कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस नंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER