कोल्हापूर : यंदा थर्टी फर्स्ट शाकाहारी!

कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषात (Happy New Year) स्वागत करण्यावर यावेळी कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यातच मार्गशीर्ष गुरुवारमुळे अनेकांनी बुधवारीच ३१ डिसेंबर साजरा केला. संचारबंदीमुळे नव्या वर्षाचे स्वागत हे घरात बसूनच करावे लागणार आहे.

दरवर्षी ३१ डिसेंबरचा जल्लोष काही औरच असतो. खवय्यांकडून महिन्याभरापासून याचे नियोजन सुरू असते. फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाईचा झगमगाट हे ठरलेलेच असते; पण यावेळी कोरोनामुळे नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होईल की नाही, याबाबत साशंकता होती.

पण या नियोजनावर शासन आदेशाने पाणी फिरले. रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री १२वाजता जल्लोष करण्यावर मर्यादा आल्या आहेत. हॉटेल व रेस्टॉरंट हे ११ वाजता बंद होणार असल्याने ३१ डिसेंबर घरातून नवीन वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली सरते वर्ष संपण्यासाठी काही तासच शल्लक राहिले आहेत. यासाठी तरुणाईने विविध बेत आखले असले, तरी यावर्षी नववर्षाचे स्वागत शिस्तीतच करावे लागणार आहे. तरुणाई दरवर्षी नववर्ष स्वागताचे हटके प्लॅन्स आखत असते.

मात्र, यंदा ११ च्या आत घरात यावे लागणार असल्याने यावर्षी नववर्षाचे स्वागत घरातच राहून करावे लागणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत काहीजण घरातच साधेपणाने हा उत्साह साजरा करणार आहेत, तर काहीजणांनी ११ च्या आत सेलिब्रेशन आटोपण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER