कोल्हापूर सिंधुदुर्ग घाट रस्ता : 14 हजार वृक्षांची होणार तोड

सोनवडे-घोटगे घाट

सिंधुदुर्ग : सोनवडे-घोटगे घाट रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी प्रकल्प यंत्रणेने कोल्हापूर (Kolhapur) भागातील ९,०९३ व सावंतवाडी विभागातील ५,१२४ अशी एकूण १४,२१७ झाडे तोडण्यासाठी नागपूर (Nagpur) येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या विभागाकडे परवानगी मागितली आहे. त्यासाठी आवश्यक असणारी रक्कम ३२ कोटी ४२ लाख रुपये उपवनसंरक्षक कोल्हापूर व सावंतवाडी विभागाकडे प्रकल्प यंत्रणेकडून वर्ग केली आहे आहे.

घोडगे-सोनवडे घाट रस्त्याच्या सेकंड वर्किंग परमिशनचा प्रस्ताव मुंबईहून (Mumbai) नागपूर येथील नोडल अधिकारी संजीव गौर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच सोनवडे घाटरस्त्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीमधील झाडे तोडण्यास परवानगी मिळेल, असा विश्वास खा. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला. मौजे दहिकळंबा व मौजे निळेगव्हाण येथील 20 हेक्टर वनजमीन उपवनसंरक्षक नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आली. कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर-सोनवडे घोडगे नाईकवाडी-शिवडाव-गारगोटी घाट रस्त्या मुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) अंतर 70किलोमीटरने कमी होणार आहे. गोव्याचे अंतरही कमी होईल कोकण आणि कोल्हापुरातील पर्यटनाचे या रस्त्यामुळे चालना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER