आंतरराष्ट्रीय शुटींग स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने याला सुवर्ण पदक

Shahu Mane

कोल्हापूर : एम्स्टर्डम येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा युवा ऑलिंपिक रौप्य पदक विजेता नेमबाज शाहू तुषार माने याने ज्युनियर गटामधे भारतीय ज्युनियर संघाचे प्रतिनिधीत्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके मिळवली.

शाहू माने सध्या १२ वी विज्ञान शाखेमधे छत्रपती शाहू विद्यालय येथे शिक्षण घेत असुन तो दुधाळी येथील शुटींग रेंजवर सराव करतो. त्याला आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिंपिक सुमा शिरुर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच त्याला कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन रायफल असोसिएशन, शाहू छत्रपती, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेच्या पात्रता फेरीमधे ६३:०१ गुणासह तो प्रथम स्थानावर होता. अंतिम फेरीमधे अत्यंत चुरस होऊन शेवटच्या शाॅटवर १०:८ गुणांचे लक्ष्य साधत त्याने भारताच्याच संस्कार हवेलीया याला ०:०१ गुणांनी मागे टाकत सुवर्ण पदक जिंकले. भारताच्याच संस्कार हवेलीया याला रौप्य तर नाॅर्वच्या डि वाॅस्स मार्टिन याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.