कोल्हापूर शिवसेना पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; उद्धव ठाकरेंना हस्तक्षेपाची मागणी

CM Uddhav Thackeray - Sanjay Pawar - Ravindra Ingawale

मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) शिवसेना (Shiv Sena) पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत मतभेद सुरु असल्याची माहिती आहे . याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख यांच्यात गेले काही दिवस वादंग पेटले आहे .

संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांनी सांगितलं आहे. पक्षातून हकालपट्टी केलेल्या लोकांना घेऊन संजय पवार कार्यक्रम करत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे.

तर दुसरीकडे संजय पवार यांनीही इंगवले यांच्यावर आरोप केले आहेत . स्वतःला पक्षप्रमुखापेक्षा मोठे समजत आहेत. दुसऱ्या पक्षात असताना शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा जळणाऱ्यांनी आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नये, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER