कोल्हापूर, सांगली आणि सातारा हॉटस्पाॅट

Hot Spot

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) वाढता प्रसार, मृत्यू आणि उपाययोजना यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून नुकताच आढावा घेतला. यामध्ये देशातील 17 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट असून त्यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याचा समावेश आहे. तिन्ही जिल्ह्यात आता कोरोनाचे सामाजिक संक्रमन सुरु झाले आहे. तिन्ही जिल्ह्यातील रुग्ण संख्या लाखाकडे वाटचाल करत आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असून उपचाराअभावी जीव जाणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाची त्सुनामी आली आहे. देशातील 17 सर्वाधिक कोरोना हॉटस्पॉटमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोनाची रुग्ण संख्या व मृत्यू दर विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या आरोग्य विभागाला कंटेन्मेंट झोनचे नियम पाळायला लावून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात केंद्राने राज्याकडून नुकताच आढावा घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३० हजार ३४ बाधित रुग्ण आहेत. यातील १८ हजार कोरोनामुक्त झाले.तब्बल ९१६ जणांना जीव गमवावा लागला. कोल्हापूर शहरात दहा हजाराच्या वर रुग्ण आहेत. तर २५० लोकांचा मृत्यू झाला. रोज सरासरी हजाराच्या पटीत रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दहा दिवसात दहा हजार रुग्ण आढळून आले. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, जावली, वाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्यात १७ हजार ८०० रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ६८३ लोकांचा मृत्यू झाला.

तिन्ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मार्चपासून ‘कोरोना’ विरोधात लढत आहे. सहा महिने एकही दिवस सुटी, रजा न घेता अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामातही मोठी वाढ झाली आहे. आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER