कोल्हापूर : ग्रीन फायर क्रॅकर्स विक्री : शहरातील 50 फटाके स्टॉल धारकांना नोटीसा

Green Crackers

कोल्हापूर : दिवाळी (Diwali) सणाच्या कालावधीत कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) क्षेत्रामध्ये हरीत लवाद तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन फायर क्रॅकर्स विक्री व वापराबाबत जारी केलेल्या आदेशाचे कोल्हापूर शहरातील सर्व फटाके विक्रेत्यांनी काटेकोरपणे पालन करावे, यासंबंधिच्या नोटीसा शहरातील 50 फटाके स्टॉल धारकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

13 ते 16 नोव्हेंबर 2020 अखेर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश दिले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये Green fire crackers ची विक्री करण्यास व वाजवणे-फोडणेस परवानगी असेल. महापालिका क्षेत्रामध्ये Green fire crackers वाजवणे किंवा फोडणेस सायंकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे. आदेशाचे काटेखोरपणे पालन करण्याबाबतची नोटीस बजावली असून आज कोल्हापूर शहरातील 50 फटाके स्टॉल धारकांना ग्रीन फायर क्रॅकर्स विकणेबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER