महापौरांच्या आवाहन कोल्हापूरकरांनी झिडकारले ; जनता अल्प कर्फ्युला प्रतिसाद

Kolhapur

कोल्हापूर : शहरामध्ये करोनाचा (Corona) वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरांमध्ये शुक्रवारपासून जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर निलोफर आजरेकर यांनी शहरात आजपासून दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सने त्यास पाठींबा दिला आहे. मात्र बहूतांश व्यापारी संघटनांनी बंदला विरोध केला. त्यामुळे आजपासून कोल्हापूरशहरात सुरु झालेल्या जनता कर्फ्युला शहरवासीयांनी प्रतिसाद दिला नाही. महापौराचे आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करीत दैनंदिन व्यवहार सुरू ठेवल्याचे चित्र आहे.

जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी, स्टेशन रोड, गुजरी, लक्ष्मीपुरी, आदी ठिकाणी दुकाने सुरू आहेत. तर काही मोजक्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून याला प्रतिसाद दिला. चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने एक आठवड्यासाठी जनता संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे, तर महापालिकेत झालेल्या बैठकीत दहा दिवसांसाठी ऐच्छिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

शहरातील औषध, दुध ,कृषी ,पेट्रोल पंप ,बँक आदी ठिकाणचे व्यवहार सुरू होते. आजच्या बंदमध्ये सहभागी करून घेण्याबाबत छोटा विक्रेत्यांना विचारात घेतलेले नव्हते. छोट्या विक्रेत्यांची परिस्थिती गेली चार महिने खूपच बिघडलेली आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आजच्या बंदमध्ये सहभागी झाले नाहीत, कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी ही आजच्या बंदला विरोध दर्शवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER