कोल्हापूर : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने

Protests against fuel price hike

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमध्ये देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली. तरीही केंद्र सरकार दररोज पेट्रोल – डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे, असा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीने सरकारविरोधात निदर्शने केली. इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत दसरा चौकात निदशने करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डी. जी.भास्कर म्हणाले, देश गंभीर संकटाचा सामना करत असताना मोदी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करुन नफेखोरी करत आहे. इंधन वाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूचे दर वाढतात, याचे भान केंद्र सराकारला असायला हवे. सरकारने ही अन्यायी इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे, उद्योग, व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, अशा परिस्थितीत होणारी इंधन दरवाढ सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी असून, अन्याय करणारी आहे.

त्यामुळे सराकरने ही इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निदर्शनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, लताताई नागावकर, सुरेश सावर्डेकर, सोमनाथ घडेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER