कोल्हापूर : बिंदू चौकात कृषी विधेयकाची होळी

Agriculture Bill

कोल्हापूर : कृषी अध्यादेश आणि लोकसभेत समंत केलेल्या विधेयकांना विरोध (Agriculture Bill) करण्याचा निर्धार देशातील किसान संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या सहभागाने अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने बिंदू चौकात विधेयकाची शुक्रवारी विधेयकाची होळी केली. याशिवाय वडगाव,शिरोळ गारगोटी, शाहुवाडी, पन्हाळा यासह इतरही तालुक्यात आंदोलन झाले.

शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, शेती विधेयके हाणून पाडा, शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांचा धिक्कार असो अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला. किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी कंत्राटी शेतीमुळे छोटा सीमांत शेतकरी शेतीतून उद्ध्वस्त होणार आहे. शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढवत देशभर २८ सप्टेंबर या भगतसिंग जयंतीदिनी व्यापक जनजागृती मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, लाल निशाण पक्ष, या संघटना व पक्ष सहभागी झाले. बिंदू चौकातील आंदोलनानंतर करवीर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER