कोल्हापुरी गुळात साखरेची भेसळ

kolhapur-news-jaggery-adulteration

कोल्हापूर :- वर्षाला अडीचशे कोटी उलाढाल असलेल्या कोल्हापुरी (Kolhapur) गुळाला जीआयमुळे जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होत आहेत. साखर मिसळून जादा दर मिळत असल्याने सुमारे ६० टक्के गुळाला भेसळीने (Jaggery-Adulteration) ग्रासले आहे. एका बाजूला कोल्हापुरी गुळाचे ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न होत असताना साखरमिश्रित गुळाचे मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून दराची हमी मिळाल्याखेरीज कोल्हापुरी गुळाचा नैसर्गिक गोडवा कायम राहणार नाही.

कोल्हापुरातील ८० टक्के गूळ  गुजरात आणि राजस्थानला जातो. १० हजार क्विंटल गूळ  इंग्लड, अमेरिका, आखाती देश व ऑस्ट्रेलियात निर्यात होतो. तुलनेत उसाला दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा गूळ  करण्याकडे कमी झालेला ओढा, वीजदर, मनुष्यबळ, अनियमित गुळाचा दर यामुळे गुऱ्हाळ घरांचे अर्थकारण बिघडले. जिल्ह्यात यापूर्वी हजारांवर असणारी गुऱ्हाळघरांची संख्या आता ४०० वरून २५० वर आली आहे. कोल्हापुरी गुळाची मागणी कायम आहे; मात्र उत्पादनात वाढ होत नाही.

गुळाचा गोडवा वाढून स्थिर दर मिळावा, यासाठी साखर मिसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका बाजूला जीआयद्वारे भेसळ रोखून जगभरातील बाजारपेठ गुळाला मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र साखरमिश्रित गुळाचा प्रश्न कायम आहे. बदललेल्या अर्थकारणात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, आर्थिक पाठबळ देत, गुळाचा दर्जा वाढविण्यासह गुऱ्हाळघरांची संख्या वाढवून उत्पादन वाढीकडेही शासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER