कोल्हापूर महापिकेचा आर्थिक गाडा रुतला

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसमोर (Kolhapur Municipal Corporation) कोरोनाने (Corona) आर्थिक संकट उभे केले आहे. 439 कोटींपैकी एप्रिलपासून सप्टेंबरअखेर पहिल्या सहामाहीत केवळ 137 कोटी रु. महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. केवळ 31.32 टक्के वसुली झाली आहे. त्यातही राज्य शासनाकडून जीएसटीपोटी मिळालेल्या 73 कोटींचा समावेश आहे. महापालिका कर्मचार्‍यांच्या पगारावर वसुलीचा परिणाम झाला असून 1 तारखेचा पगार 18 तारखेवर गेला आहे.

2020-2021 या आर्थिक वर्षासाठी महापालिका प्रशासनाला 439 कोटी 6 लाख 28 हजार इतके महसुली टार्गेट देण्यात आले आहे. साहजिकच महिन्याला साधारणतः 36 ते 37 कोटी रुपये उत्पन्‍न अपेक्षित आहे.

2019-2020 या आर्थिक वर्षात नगररसेवकांना ऐच्छिक बजेट देण्यात आले होते. परंतु, अद्याप मागील वर्षाच्या बजेटमधील मंजूर विकासकामांवर अद्याप खर्च झालेला नाही. चालू आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाला 439 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. याही बजेटमध्ये नगरसेवकांना ऐच्छिक निधी दिला आहे. मागील बजेटमधीलच कामे झालेली नाहीत. त्यात आता वसुली घटली आहे. परिणामी, अद्याप विकासकामांना हात लागलेला नाही. शहरात पाणी, रस्त्यासह इतर नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तब्बल 60 कोटींची विकासकामे रखडली आहेत. यात पवडी विभागाची 42 कोटी, पाणीपुरवठा 8 कोटी व इतर कामे 10 कोटींची आहेत. तोपर्यंत आता 15 नोव्हेंबरला विद्यमान सभागृहाची मुदत संपणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER