हद्दवाढीशिवाय कोल्हापूर मनपा निवडणूक नको : कृती समिती

कोल्हापूर मनपा निवडणूक

कोल्हापूर : राज्यातील इतर शहरांची अनेकदा हद्दवाढ झाली असताना कोल्हापूरवरच अन्याय का? असा सवाल करून आता हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी कोल्हापूर हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. हद्दवाढीसाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचातारांकित औद्योगिक वसाहतीसह ४२ गावांचा हद्दवाढीत समावेश करावा, अशी मागणीही केली आहे. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची तातडीने भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचा निर्णयही कृती समितीने घेतला.

कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत सहनिमंत्रक बाबा पाटें. सोबत अॅड. बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, मारुतराव कातवरे, चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, किशोर घाडगे, माणिक मंडलिक, दुर्गेश लिंग्रस, चंद्रकांत बराले, सचिन तोडकर, अमर निबाळकर, सुनील देसाई यांची भाषणे झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER