कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला, २१ डिसेंबरला निघणार आरक्षण सोडत

Kolhapur Muncipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा (Kolhapur Municipal Corporation election ) बिगुल अखेर वाजला आहे. निवडणुकीसाठी 21 डिसेंबरला सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत त्यावर हरकती वसूचनांसाठी वेळ देण्यात आला आहे.

महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजता सोडतीला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपली आहे. कोरोनाच्या सावटामुळे महापालिका निवडणूक झालेली नाही. परिणामी 16 नोव्हेंबरपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 81 प्रभागाचा प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे. त्याबरोबरच 2005, 2010, 2015 मधील महापालिका निवडणुकीतील आरक्षणाचा अहवालही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER