कोल्हापूर महापालिका निवडणूक आज आरक्षण सोडत : इच्छुकांची धाकधूक

कोल्हापूर महापालिका निवडणूक

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूक २०२० अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत आज सोमवारी (दि. २१) अधिकृत प्रभाग आरक्षण सोडत सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात आयुक्त डॉ कांदबरी बलकवडे यांच्या नियोजनात सोडतीला प्रारंभ होणार आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी व नागरिकांसमोर पूर्ण पारदर्शीपणे ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. इच्छुकांत सोडतीबाबत उत्सुकता अन् हुरहुर लागली आहे.

महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने ११ डिसेंबरला ८१ प्रभागांचा प्रारूप प्रभागरचना आराखड्यासह २००५, २०१०, २०१५ मधील आरक्षणाचा अहवाल सादर केला आहे. या प्रक्रियेनंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्याची तयारी सुरू होत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब उपस्थित आहेत.

सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना २३ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. २३ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ताराबाई पार्कमधील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सूचना, व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला ६ जानेवारीला सादर केले जाईल.

तीन व्हिडीओ कॅमेन्यांद्वारे रेकॉर्डिंग केले जात आहे. तसेच सोडतीचे स्थानिक केबल, यूट्यूब, फेसबुकवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. सोडतीवेळी प्रभागाचे नाव, नकाशा, चतुःसीमा, लोकसंख्येसह इतर माहितीवर आधारित १ ते ८१ प्रभागांचे वाचन होईल. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी राखीव ११ प्रभागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने हे प्रभाग निश्चित केले जातील. पहिल्यांदा अनुसूचित जातीसाठी ११ प्रभाग लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने काढण्यात येतील. त्यापैकी ६ प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२ प्रभागांचे आरक्षण काढले जाईल. स्यापैकी ११ प्रभाग ओबीसीसाठी राखीव असतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण ४८ प्रभाग असून, त्यापैकी महिलांसाठी २४ प्रभाग आरक्षित केले जातील त्यानंतर उर्वरित २४ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER