कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा

कोल्हापूर :- कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीसह, ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आला होता.

खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार, राजकपूरला पहिला मेकअप, पहिले पोस्टस पेंटिंग असे सगळे पहिले वहिले घडले ते या कलानगरीत. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीलाही नियमांत अधीन राहून काम करायला शिकविले ते येथील चित्रतपस्वी. या मातीने रसिकांना उत्तमोत्तम चित्रपट तर दिलेच शिवाय लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ अशी फळीच तयार केली. आजही ही परंपरा व वारसा चालवण्याचा प्रयत्न येथील सिनेव्यावसायिक करत आहेत. या सगळ्या देदीप्यमान इतिहासाला शोभायात्रेतून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्र्याविना भरणार नागपूर अधिवेशन