कोल्हापुरातील मनसेची मुंबईतील महाअधिवेशनासाठी तयारी

MNS

कोल्हापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. याबाबत कार्यकर्त्यांची वाहतुकीची सोय व इतर पूर्वतयारी संदर्भात आज, रविवारी कोल्हापूर मनसे पदाधिकाऱ्यांचा सर्किट हाऊस इथं जिल्हास्तरीय मेळावा पार पडला.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी पक्षाचं काम प्रामाणिक करण्याच्या सुचना केल्या. जो पदाधिकारी अथवा कार्यकर्ता पक्षाशी बांधील राहून काम करणार नाही त्यांची येत्या काळात गय केली जाणार नसल्याचं सांगितले. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात आंदोलने, मोर्चा यासह सामाजिक कामांमध्ये सक्रिय होण्याचे आवाहनही केले. यावेळी राजू जाधव, प्रसाद पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.