राष्ट्रवादीला धक्का ; ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा सत्ताधारी गटात प्रवेश

mahadik-blows-nationalist-panel-in-gokul

कोल्हापूर : गोकुळमध्ये राजकारण (Gokul Politics) आणणे बरोबर नाही, असे सांगत दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून या निवडणुकीत आपण सत्ताधारी आघाडी सोबत असल्याची स्पष्ट भूमिका संचालक विलास कांबळे (Vikas Kamble) यांनी मांडली. या निर्णयामुळे राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का बसला आहे .

गेल्या निवडणुकीत कांबळे हे विरोधी राष्ट्रवादी आघाडीकडून निवडून आलेले एकमेव संचालक आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी गोकुळच्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देऊन, विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला. गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज कार्यकर्ते, सत्ताधारी महाडिक-पाटील गटाला समर्थन देत आहेत.

गोकुळमधील राष्ट्रवादीचे एकमेव संचालक विलास कांबळे यांनीही काल सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. राजकीय ईर्ष्येपोटी विरोध करून, उत्तम चाललेल्या गोकुळ दूध संघाची व्यवस्था कुणी विस्कळीत करू नये, असा टोला विलास कांबळे यांनी लगावला. दूध उत्पादकांच्या आणि संस्थेच्या हिताचा विचार करून आपण या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान विलास कांबळे राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून एकमेव संचालक बनले. गेल्या पाच वर्षात गोकुळचा पारदर्शी कारभार जवळून बघितला. अशावेळी राजकीय भूमिकेतून गोकुळकडं बघू नये, असे सांगत, राष्ट्रवादीच्या विलास कांबळे यांनी, सत्ताधारी आघाडीला समर्थन दिले. हा विरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असून, निवडणूक होईपर्यंत अनेकजण सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देतील, अशीं शक्यता वर्तविण्यात येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button