पुणे पदवीधरमध्ये मतदार नोंदणीत कोल्हापूर अग्रेसर

Pune Graduate Constituency

कोल्हापूर :- पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची मतदार नोंदणी ५ नोव्हेंबरला संपली. यात कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक म्हणजे ८७,९५८ आहे. पाठोपाठ पुणे, सांगली जिल्ह्यांची नोंदणी झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून पुण्याचे राजेश पांडे यांचे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड (कुंडल, जि. सांगली) यांचे नाव आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांचा निर्णय अद्याप झाला नसला तरी प्रमुख लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार अशीच होणारा आहे. या वर्षीच्या निवडणुकीत मात्र आमदार चंद्रकांत पाटील व दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सारंग पाटील दोघेही रिंगणात नाहीत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

मागील निवडणुकीत मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील अल्पमतांनी विजयी झाले. त्यांना ६१ हजार मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची ५९ हजार मते मिळाली. अपक्ष निवडणूक लढवलेल्या अरुण लाड यांनी तुल्यबळ लढत देत ३२,७०० मते घेतली.

भारतीय जनता पक्षाकडून राजेश पांडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र कोल्हापूरची नोंदणी सर्वाधिक असल्याने माणिक पाटील (चुयेकर) यांना उमेदवारी मिळते का? याची उत्सुकता स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अरुण लाड यांना मिळेल अशी चर्चा आहे; मात्र शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर असणारे भैय्या माने हे देखील पदवीधरसाठी इच्छुक असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव उचलून धरले आहे.

मतदानासाठी २२ दिवसच उमेदवारांना मिळणार आहेत. भाजपचा पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळवणार का? की भाजप विजयाची हॅट्ट्रिक करणार हे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यावरच कळू शकेल.

जिल्हानिहाय मतदार नोंदणी

कोल्हापूर ८७,९५८
सांगली ८५,८२७
पुणे ८५.६१९
सातारा ५६,१२६
सोलापूर ४८,९१९

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER