कोल्हापूरचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद

ऋषीकेश रामचंद्र जोंधळे

कोल्हापूर : पाकिस्तानने (Pakistan) शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला. त्यात कोल्हापुरातील (Kolhapur) बहिरेवाडी ता. आजरा येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) हे जवान शहीद झाले.

ऋषिकेश यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती. ११ जून२०२० रोजी सुट्टीवरून जम्मू येथे हजर झाले होते. २०१८ ला कोल्हापूर बी.आर.ओ. ६ मराठा मध्ये ते भरती झाले होते. त्यानंतर त्यांचे बेळगावमध्ये नऊ महिन्याचे प्रशिक्षण झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई,वडील आणि लहान बहीण आहे. एकुलता एक मुलगा शहीद झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER