सोमवारपासून कोल्हापूर हैदराबाद विमानसेवा

Airlines - Hardeep Singh Puri

कोल्हापूर : केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने येत्या सोमवार म्हणजे 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ही माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. या निर्णयानुसार कोल्हापुरातून येत्या सोमवारपासून हैदराबाद व तिरुपती मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे.

देशातील कोरोनाव्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभर लॉकडाऊन लागू केला. या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसाय व्यापाराबरोबरच हवाई वाहतूक सेवा बंद करण्यात आली. आता सोमवारपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरू होत आहे.

त्यामध्ये कोल्हापूरहून हैदराबादला इंडिगो व अलायन्स एअर आणि तिरुपतीला इंडिगो कंपनी विमानसेवा सुरू करत आहे. या मार्गावरील विमान सेवासाठी ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER