महाडीकाना पुन्हा पाणी पाजू : पालकमंत्री सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर :- महाडिक (Mandlik) कंपनीला वेळोवेळी पाणी पाजले आहे, ते यापुढेही पाजू, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. त्याच्या कसबा बावडा गावातील गावातील पाण्याच्या टाकीसह विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नूतन आमदारांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

शहराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या थेट पाईपलाईनचे ५३ पैकी ४९ कि.मी. चे काम पूर्ण झाले असून, मेपर्यंत काम पूर्ण होऊन कोल्हापूरला पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षात ३७ कोटींच्या विकासकामांपैकी काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही सुरू आहेत. पॅव्हेलियन ग्राऊंड येथे खेळाडूंना रात्रीही खेळाचा सराव करता यावा यासाठी फ्लडलाईट सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. तरीही या निवडणुकीत किमान काही ठिकाणी आपण एकत्र येऊन लढू शकतो का, याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, स्वतः मी आणि खासदार संजय मंडलिक एकत्र बसून घेऊ, अशी म्वाही मंत्री पाटील यांनी दिली.खा. संजय मंडलिक म्हणाले, शहरातील विकासाचे रोल मॉडेल म्हणून कसबा बावड्याकडे बघावे. आ. ऋतुराज पाटील म्हणाले, कसबा बावडा लाईन बाजारच्या विकासासाठी राहिले आहे. कसबा वावड्याचे आणि पाटील कुटुंबीयांचे ऋणानुबंध कायम राहतील.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर महापालिका निवडणुक : काँग्रेस स्वतंत्र लढणार – सतेज पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER