कोल्हापुरातील चार ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडणार

Kolhapur Gram Panchayats Sarpanch will elect directly from people

कोल्हापूर : माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

तहसीलदारांकडून उद्या, गुरुवारी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज भरायला ६ मार्चपासून सुरुवात होणार असून, १३ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत (८ मार्चची रविवार व १० मार्चची सार्वजनिक सुट्टी वगळून) अर्ज भरण्याची मुदत राहणार आहे.

१६ मार्चला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १८ मार्च दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार राहणार आहे. २९ मार्चला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्चला होणार आहे