कोल्हापूर : सरपंचासह सदस्यांनाही सातवी पासची अट; कार्यकर्त्यांची धावपळ

Kolhapur Gram Panchayat Election.jpg

कोल्हापूर : ग्रामपंचायतीची निवडणूक (Kolhapur Gram Panchayat Election) लढविणारी प्रत्येक व्यक्ती ही सातवी पास असायलाच पाहिजे, अशी नवी अट घालण्यात आल्यामुळे पॅनलप्रमुखांना सातवी पास उमदेवारांचा आता शोध घ्यावा लागत आहे. पूर्वी सरपंच सातवी पास अशी अट होती. आता सरपंचऐवजी सदस्य असा शब्द नमूद करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्वतंत्र खाते उघडण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याने आता सहकारी बँकांमध्ये देखील स्वतंत्र खाते उघडण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने तीन वर्षांपूर्वी सरपंच निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरपंचपदासाठी किमान सातवी पास असणे ही अट घालण्यात आली होती. त्यानंतर सत्तांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) तसेच शिवसेनेचे (Shiv Sena) नवे सरकार अस्तित्वात आले आणि त्यांनी थेट जनतेतून सरपंच निवडणूक निर्णय रद्द करून प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडीचा पूर्वीसारखाच निर्णय घेतला. शिवाय सर्वच सदस्यांना सातवी पास अट तसेच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकी नंतर काढणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांनी निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत बँक, शेड्यूल्ड बँक यामध्येच स्वतंत्र चालू किंवा बचत खाते उघड्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, काही जिल्ह्यात बँकेमध्ये बचत आणि चालू खाते उघडण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने उमदेवारांना राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेसह सहकारी बँकेतदेखील स्वतंत्र खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. बँकांनी खाते उघडण्यास येणाऱ्या उमदेवारांना सहकार्य करावे, असे देखील सुचित केले आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता गावागावांत सध्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER