कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने

कोल्हापूर : कोरोनामुक्तीसाठी (Corona free) राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक कमी म्हणजे ४९ इतकी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २४ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. सरकारने बाधित रुग्ण आढळतील तो परिसर सील करून कंटेन्मेंट, रेड झोन जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या जिल्ह्यातील कोरोना ची स्थिती ध्यानात घेऊन स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर गेली.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे कमी होत आहे. रिकव्हरी रेट हा ९६ टक्के होता तेव्हा कोल्हापूर जिल्हा राज्यात रिकव्हरीमध्ये तिसर्या क्रमांकावर होता. आता हा रेट ९८ टक्क्यांच्या आसपास आला आहे. राज्य शासनाकडे अधिकृत आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा रिकव्हरी रेटमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर येईल असे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER